You are currently viewing जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमेश कानवळकर ठरला “वेंगुर्ला श्री” चा मानकरी..

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमेश कानवळकर ठरला “वेंगुर्ला श्री” चा मानकरी..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या कॅम्प येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आपल्या पिळदार शरीरयष्टी मुळे प्रथमेश कानवळकर “वेंगुर्ला श्री” या किताबाचा मानकरी ठरला.

वेंगुर्ले येथे प्रो फिटनेस व्यायामशाळे तर्फे या स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. पुष्पा चित्रपटातील गाजत असलेल्या “श्रीवल्ली” या गाण्यावर शरीरसौष्ठव पटूने सादर केलेला डान्सही सर्वांची वाहवा मिळवून गेला. शेवटपर्यंत ही स्पर्धा रंगतदार ठरली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी, स्पर्धेचे प्रायोजक श्री. साईश नाटेकर, श्री. वीरेंद्र कामत आडारकर तसेच श्री. गणेश अंधारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. साईश नाटेकर यांचे हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल याप्रमाणे, वेंगुर्ला ‘श्री’ चा मानकरी प्रथमेश कानवळकर (शिवाजी फिटनेस), मोस्ट इम्प्रूव्हर रोहन नाईक (सिद्धेश्वर व्यायामशाळा) तसेच बेस्ट म्युझिक पोजर चा मानकरी हितेंद्र कदम (बी स्ट्राँग बांदा) ठरला.

५५ किलो गट – १. राजेंद्र बंडूवेल २. हितेंद्र कदम ३. योगेश कांबळी ४. प्रकाश नानेलकर ५. विशाल जाधव, ६० किलो गट – १. प्रथमेश कानवळकर २. ईश्वर मामलेकर ३. ओम सावंत ४. सिद्धेश साळगांवकर ५. भूषण खोत * ६५ किलो गट* १. महादेव साळगांवकर २. यासीन आजगावकर ३. भूषण शिरोडकर ४. रोहन इझरे ५. संजय पडवळ ७० किलो गट – १. सहदेव नार्वेकर २. श्रीपाद अरवारी ३. सुजय देसाई ४. योगेश मेस्त्री ५. ओमकार केळुसकर

तर * ७० किलो वरील गट – १. रोहन नाईक २. रुपेश सावंत ३. रोहन पोळ ४. दर्शन गोडकर ५. सिद्धेश कदम ठरला. स्पर्धेचे परिक्षण महाराष्ट्र श्री. नरेश जाधव सर व श्री. राजेश हिरोजी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. काका सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी व साईश नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अभिप्राय द्या..