वास्को /-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ वास्को विमानतळावर आल्यावर कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी अभय शिरसाठ प्रभारी तालुकाध्यक्ष ,प्रकाश जैतापाकर, प्रांतिक सदस्य, सुंदरवल्ली स्वामी महिला तालुकाध्यक्ष, तबरेज शेख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, चिन्मय बांदेकर शहराध्यक्ष युवक काँग्रेस, तोशिक शेख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी नानाभाऊ पटोले याने कुडाळ तालुका काँग्रेसचे खास अभिनंदन केले. सिंधुदुर्गात आपण खाते खोलले आहे त्.यामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा लक्ष असणार असून विकास कामांसाठी व पक्ष संघटनेसाठी पुढील महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे मान्य केले.दोन्ही नगरसेवकांचे शहरातील जनतेचे व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
कुडाळ तालुका काँग्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेजारी असणाऱ्या गोवा राज्यातील मतदार संघात उमेदवारांचे काम करण्याचे आदेश नानाभाऊ पटले यांनी दीले,व गोवा राज्यात काँग्रेस आल्यावर भविष्यात सिंधुदुर्गात सुद्धा काँग्रेसचे वारे वाहणार .त्यामुळे तुम्ही गोव्यात उमेदवार निवडून येण्यासाठी खास प्रयत्न करा असे आवाहन केले.