कणकवली /-

केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी भारतीय मजदूर संघाच्या मागणीला प्रतिसाद देत ई-श्रम पोर्टलद्वारे देशातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे जे कल्याणकारी पाऊल उचलले आहे त्यात महाराष्ट्र शासनाने सहकार्य देऊन ई-श्रम नोंदणीची धडक मोहीम राबविण्याची मागणी आज रोजी झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा अधिवेशनात करण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघ नूतन जिल्हा अध्यक्ष विकास गुरव यांनी दिली. भारतीय मजदूर संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अधिवेशन कणकवली गोपुरी आश्रम येथे जिल्ह्यातील मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थित घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष अँड.अनिल ढुमणे,मुंबई विभाग संघटनमंत्री हरी चव्हाण,जिल्हा अध्यक्ष भगवान साटम व प्रदेश कार्यकरणी सदस्या सौ. अस्मिता तावडे उपस्थित होत्या. या अधिवेशनात इ-श्रम नोंदणी जलदगतीने व्हावी, कंत्राटी कामगारांना न्याय देण्यात यावा,घरेलू कामगारांचे कल्याणकारी मंडळ पुन्हा कार्यरत करण्यात यावे,बांधकाम कामारांबाबत असलेल्या समस्या दूर करण्यात याव्यात आधी ठराव संमत करण्यात आले.या अधिवेशनात केंद्र सरकारच्या २०२२ च्या अर्थसंकल्प बजेटवर नाराजी व्यक्त करून केंद्र सरकारने सुधारित कामगारांचे हिताचे बजेट संमत करण्याची मागणी करण्यात आली,या अधिवेशनास सूत्रसंचालन श्री.हरी चव्हाण ,प्रास्ताविक भगवान साटम यांनी केले.प्रमुख मार्गदर्शन अँड.अनिल ढुमणे यांचे लाभले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय मजदूर संघाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्ष विकास गुरव,उपाध्यक्ष अशोक घाडीगांवकर,राजेंद्र आरेकर,प्राजक्ता सावंत,जिल्हा सचिव म्हणून सत्यविजय जाधव, सहसचिव नंदू झाड,महेश सुर्वे श्रीम.अस्मिता तावडे,कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर,सह कोषाध्यक्ष प्रकाश वाडेकर,संघटनमंत्री म्हणून ओमकार गुरव तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून भगवान साटम यांची निवड करण्यात आली शेवटी नूतन अध्यक्ष विकास गुरव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page