You are currently viewing मालवणचे रॉक गार्डन पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आज पासून खुले..

मालवणचे रॉक गार्डन पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आज पासून खुले..

मालवण /-

पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या मानल्या गेलेल्या मालवणात पर्यटकांचे आकर्षण राहिलेल्या मालवण नगरपालिकेचे रॉक गार्डन हे कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने गेले महिनाभर बंद होते मात्र आज शासनाच्या आदेशानुसार मालवणचे रॉक गार्डन पर्यटकांना पुन्हा खुले करण्यात आले आहे.

जानेवारी महिन्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने अनेक निर्बंध लागू केले होते. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी उद्यानेही बंद ठेवणे बाबतही निर्णय झाला होता. मात्र गेल्या काही दिवसात कोरोना संख्या कमी झाल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले. उद्याने खुली करणे बाबतही निर्णय झाला. त्यानुसार गेले २२ दिवस बंद असलेले मालवणचे रॉक गार्डन मंगळवार १ फेब्रुवारी पासून राज्य शासन आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मंगळवारी दिली. पर्यटकांसाठी रॉक गार्डन पुन्हा एकदा खुले झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा