You are currently viewing कोलगाव आय टी आय येथे उभ्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक.;अपघातात २८ वर्षीय युवती गंभीर.

कोलगाव आय टी आय येथे उभ्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक.;अपघातात २८ वर्षीय युवती गंभीर.

सावंतवाडी /-

कोलगाव आय टी आय परिसरात उभ्या असणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची धडक बसून झालेल्या अपघात सेजल सुभाष राऊळ (वय २८) ही मुलगी गंभीर जख्मी झाली आहे. या अपघात तिच्या हातचे एक बोट पूर्णतः तुटून निकामी झाले आहे. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. यावेळी युवा कार्यकर्ते विनायक ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या युवतीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर तिला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्याचा सल्ला दिला. तर अपघाता नंतर डंपर चालकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला असताना स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया पोलिस स्थानकात सुरू आह

अभिप्राय द्या..