You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे कोषागार दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.;उस्फुर्तपणे १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सिंधुदुर्गनगरी येथे कोषागार दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.;उस्फुर्तपणे १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सिंधुदुर्गनगरी /-

मंगळवारी १ फेब्रुवारी २०२२ रोजी कोषागार दिनानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस येथे प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायण महापूजा व कोषागार अधिकारी डाँ.शिवप्रसाद खोत यांचे संकल्पनेतून व जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग ओरोस यांचे सहकार्याने प्रथमच रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन मा.सहसंचालक लेखा व कोषागारे,कोकण विभाग नवी मुंबई मा.श्री.अनुदीप दिघे साहेब यांचेहस्ते दिप प्रज्वलन करून झाले.यावेळी मा.श्रीमती वल्लरी गावडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग, मा.बाळासाहेब पाटील सह संचालक स्थानिक निधी लेखा सिंधुदुर्ग व वित्त विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी यावेळी या स्तुत्य व सामाजिक भावनेतून आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.

या रक्तदान शिबिरात एकूण १९ रक्तदात्यांनी उस्फुर्त रक्तदान केले.तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.सर्व रक्तदाते व जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी विभागाचे तंत्रज्ञ,अधिपरिचारीका,कर्मचारी यांचे जिल्हा कोषागार अधिकारी डाँ.शिवप्रसाद खोत यांनी सहकार्याबद्ल आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा