You are currently viewing कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कुडाळ /-

कुडाळ शहरातील कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शुक्रवार दिनाक. ४-०२-२०२२ रोजी श्री.सिद्धीगणपती मंदिर कविलकाटे कुडाळ येथे माघी गणेश जयंती उत्सव सोहळा कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे संपन्न होणार आहे.गतवर्षी कोरोना विषाणूच्या सर्संगाचे दडपण होते गणपतीच्या आशिर्वादाने श्रीचा जन्मसोहळा निर्विघ्नपणे उत्साहात आनंदाने साजरा झाला आता बहुतेक सर्व भक्तानी शासनाच्या आवाहानाप्रमाणे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले आहेत ओमिक्रोन या नव्या विषाणूच्या संसर्गाची सुरुवात झालेली आहे. त्यासाठी १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस देण्याचे शासनाने जाहीर केलेले आहे तरी सर्व भक्तजनास विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या नियम व अटीप्रमाणे कार्यक्रमात सुरक्षित अंतर ठेवावे मास्क वापरावा व समाजिक सुरक्षा कार्याला सहकार्य करावे. यावर्षी बुधवार दि. २ फेब्रुवारी २०२२ ते शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात संपन्न होत आहे.तरी आपण आपली सहकुटुंब उपस्थिती दर्शवावी, सुरक्षित अंतर ठेवून व मारक वापरून श्रीचा आशिर्वाद घ्यावा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धीगणपती मंदिर कविलकाटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सिद्धीगणपती मंदिर कविलकाटे मंदिरात माघी गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन.बुधवार, दि.०२ फेब्रुवारी २०२२,रात्री ८ वाजता स्थानिक मुला मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रम.तसेच गुरुवार, दि. ०३ फेब्रुवारी २०२२,रात्री ८ वाजता खानोलकर पारंपारिक दशावतार नाटय मंडळ खानोली यांचे पौराणिक दशावतार नाटक सिंधूरासूर अर्थात राजाचक्रपाणि.माघी गणेश जयंती दिवशी शुक्रवार, दि. ०४ फेब्रुवारी २०२२ सकाळी ०५:०० वा. सौ. श्वेता व श्री. रामचंद्र काशिनाथ पावसकर उभयंताकडून श्रीची पाद्यपुजा सकाळी १०:०० वापासून श्री गणेश सोहळयापर्यंत ह.भ.प.श्री. गोविंद आसोलकर बुवा (बाव) यांच गणेश जन्मावर सुश्राव्य किर्तन दुपारी १२.०० वा. दुपारी ०१.श्री गणेश जन्मसोहळा, महाआरती सामुदायिक प्रार्थना.महाप्रसाद दुपारी ०१ ते ०३ वा स्थानिक भजने दुपारी ०३ ते ०४ वा. महीलांचे हळदीकुंकू कार्यक्रम.दुपारी ३.३० ते ४.३० वा श्री चांमुडेश्वरी महीला फुगडी मंडळ कविलकाटे यांचा पारंपरिक फुगडी कार्यक्रम. दुपारी ४.३० ते ५.३० वा श्री सिद्धीगणपती महीला फुगडी मंडळ कविलकाटे यांचा पारंपरिक फुगडी कार्यक्रम. सायं ६.३० वा. सायं ०७.०० वा.- श्री ची सामुदायिक आरती – ओमकार नटेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कालेली ता. कुडाळ यांचे महान पौराणिक दशावतार नाटय तारील हा तुज शिवगणेश ,रात्री १०.०० वा. सुश्राव्य भजने या सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धीगणपती मंदिर, कार्यकारी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा