You are currently viewing जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा होणार मार्गदर्शन.;जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी करतील प्रस्तावना.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा होणार मार्गदर्शन.;जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी करतील प्रस्तावना.

दोडामार्ग /-

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शासकीय क्षेत्रात नोकरी मिळवणे खूप कठीण आहे,त्यातच अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात परंतु योग्य ते मार्गदर्शनापासून हे विद्यार्थी वंचित असल्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे खुप कठीण जात असते,याचाच आढावा घेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासाठी मार्गदर्शन होणार असून याची प्रस्तावना श्रीमती.के मंजूलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग करणार आहेत, तर मार्गदर्शक म्हणून श्रीमती.स्वाती देसाई परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी व श्री.संकेत यमगर परिविक्षाधीन तहसिलदार करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील तरुण पिढी जे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी राज्यशास्त्र विषयाची तयारी कशी करावी व अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी वर मार्ग कसा काढावा याकरिता उपयुक्त ऑनलाइन मार्गदर्शन फेसबुक लाईव्ह द्वारे दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ बुधवार रोजी सायंकाळी ०४ ते ०५ वाजता या वेळेत आयोजित केले आहे.
परीक्षेच्या स्वरूपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे, तरी याबाबत कोणतीही शंका,प्रश्न असल्यास आपण विचारू शकता सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आपणास असलेली शंका किंवा प्रश्न कार्यक्रमा दरम्यान कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करावी अशी माहीती आयोजकांनी दिली आहे.
संकेतस्थळ:- https://www.facebook.com/collector-office-sindhudurg-01061044850492

अभिप्राय द्या..