You are currently viewing मनसे लॉटरी सेना अध्यक्षांच्या मालकीच्या झाडांवर अज्ञातांची कुऱ्हाड.;दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी.

मनसे लॉटरी सेना अध्यक्षांच्या मालकीच्या झाडांवर अज्ञातांची कुऱ्हाड.;दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी.

ओरोस /-

मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कणकवली तालुक्यात ओसरगावी वडिलोपार्जित घर व शेती वाडी आहे.गणेश कदम हे व्यवसाय निमित्ताने मुबंईत स्थायिक असल्याने गावचे घर बंद असते.याचाच गैर फायदा घेत अज्ञात व्यक्तिंनी त्यांच्या घराजवळील त्यांच्या स्वतःच्या मालकीची आंबा, साग व शिवनची झाडे तोडली. ओसरगाव हे ईको सेन्सिटीव्ह झोन मध्ये येते पण तरीही बेकायदेशीररीत्या झाडे तोडल्या मुळे गणेश कदम यांच्या वतीने मनसेचे कणकवली तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवडकर यांनी वनखाते अधिकारी मूनशिकर यांच्या जवळ रीतसर तक्रार दाखल केली. व दोषींवर लवकरात लवकर कारवाईची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा