देवगड /-
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून , देवगड मधील शिक्षण विकास मंडळ संचलित देवगड कॉलेज मध्ये ध्वजारोहण तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाला शिक्षण विकास मंडळ , देवगडचे कार्यवाह वैभव बिडये ,उपाध्यक्ष चंद्रहास मर्गज,सदस्य शैलेश महाडिक , आचरेकर,देवगड महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या डॉ.सुखदा जांबळे , अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सर्जेराव गर्जे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .सुरेश कुर्लीकर , पर्यवेक्षिका प्रा .शुभदा वालावलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली .
अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सर्जेराव गर्जे यांच्या शुभ हस्ते ध्वज फडकविण्यात आला . राष्ट्रगीत झाल्यावर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कु. सुधांशू सोमण आणि सावनी शेवडे यांनी ‘भारत की पेहचान’ हे नव्यानेच संगीतबद्ध केलेले देशभक्तीपर गीत सादर केले .कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय , राज्य आणि जिल्हा पातळीवर विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या राहुल सारंग ( प्रयोग सादरीकरण ) ,सुधांशू डामरी( निबंध स्पर्धा ) यांचे मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले .
वरिष्ठ महाविद्यालयातील एनसीसी विभागातील लान्स कार्पोरल प्रतीक घाडीगावकर ( B.M.S.फायरिंग – प्रथम ) ,कु.अनिश कोयंडे ( T.Y.I.T.इलेक्ट्रिक ऑऊटबोर्ड निर्मिती ) यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सव , जिल्हा स्तरावर यशस्वी ठरलेल्या सानिका पाटणकर ( गायन – प्रथम ) , ओम मिठबावकर ( वक्तृत्व , कथाकथन – तृतीय ) , शुभम वाड्ये ( पोस्टर मेकिंग – प्रथम ) , मयुरेश तारी ( ऑन द स्पॉट पेंटिंग – तृतीय ) यांचाही सत्कार करण्यात आला . शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या युवा महोत्सवात आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग ,भावगीत गायन ,एकपात्री अभिनय , कथाकथन आणि वक्तृत्व अशा सहा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल देवगड महाविद्यालयाला ‘जिल्हास्तरीय ऑल राऊंडर चॅम्पियनशिप ‘ मुंबई विद्यापीठाकडून प्राप्त झाली , याबद्दल सांस्कृतिक विभागाचे प्रा.डॉ .नितीन वळंजू आणि संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात आले .
मराठी भाषा संवर्धन पंधरवडया निमित्त आयोजित , ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा – मुक्ता परांजपे ,कु.दिप्ती डोलकर विभागून प्रथम , शुध्द लेखन स्पर्धा – चैत्राली कोदे – प्रथम , वक्तृत्व स्पर्धा – शीतल पवार – प्रथम यांचाही मराठी पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला महाविद्यालयातील प्रा .डॉ .भेंकी आणि प्रा .डॉ . कुनुरे यांचा डॉक्टरेट मिळवल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . NCC विभागातील कॅडेट्सनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली . कोविड – १९ चे सर्व नियम पाळून ,शासकीय नियमाप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाला . बक्षीस प्राप्त विद्यार्थी,सर्व प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
