कणकवली /-

कणकवली तालुक्यातील किशोर मोरजकर ट्रस्ट नांदगाव यांच्या वतीने दशक्रोशीतील नागरीकांसाठी त्वचा रोग , गुप्त रोग ,कुष्ठरोग या वर रुग्णांची मोफत तपासणी शिबिर २६ जानेवारी रोजी ११ ते १ पर्यंत यावेळेस नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते .या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.तालूका भरातून रुग्णांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेतला आहे.

सदर शिबिरासाठी डॉ .शिशिर खोसे पाटील हे तज्ञ डॉ लाभले होते .सदर डॉ हे ससून हॉस्पिटल पुणे येथून एम डी पदवी प्राप्त असून केंद्र शासनाची DNB त्वचारोग तज्ज्ञ पदवी पूर्ण झालेली आहे.यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका येथे नियुक्ती झाल्याने त्वचा रोग तज्ञ डॉ व ते ही एम डी पहील्यांदाच रुजू झाले आहेत.
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,उपसरपंच निरज मोरये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, शिबिरासाठी डॉ .शिशिर खोसे पाटील, नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे , डॉ दिक्षा वाळके,मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, ट्रस्ट चे उपाध्यक्ष भाई मोरये , नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, कमलेश पाटील,राजू तांबे, तुकाराम तुप्पट, पप्पी सापळे,एकनाथ मोरये तसेच रास्ते मॅडम आरोग्य सहाय्यक ठाणेकर ,आरोग्य सेवक आर .के.चव्हाण, आरोग्य सेविका पवार , मुसळे ,आशा गटप्रवर्तक सोनाली शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.शिशिर खोसे पाटील बोलताना म्हणाले की, मी मूळ विदर्भातील असला तरी पहील्या पासुन कोकणातील आवड व ससून रुग्णालयात पुणे येथे पदवी पूर्ण करत असताना या कोकणातील , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण तपासणी साठी येत होते . म्हणून माझी इच्छा होती की, येथील जनतेची सेवा करावी .ती आज शिबिराच्या माध्यमातून पूर्ण झालेली असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.शिशिर खोसे पाटील, नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांचा शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर,तर आभार भाई मोरजकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page