You are currently viewing पत्रकार संतोष गावडे यांनी केला विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

पत्रकार संतोष गावडे यांनी केला विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

चौके/

मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष पत्रकार संतोष गावडे यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चौके प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देउन गुणगौरव करण्यात आला.

दरवर्षी चौके मराठी शाळेतील परीक्षेमध्ये चांगल्या प्रकार गुण मिळविणार्‍या मुलांचा गुणगौरवांचा कार्यक्रम केला जातो. प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुलांचा गुणगौरव केला जातो. कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे गेली दोन वर्ष हा गुणगौरव कार्यक्रम जाहीररित्या करण्यात आला नव्हता. मात्र या वर्षी हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमीत्त पार पाडण्यात आला. पत्रकार संतोष गावडे हे आपले वडील कै. बाबाजी गावडे व आई कै. सत्यभामा गावडे यांच्या स्मरणार्थ चौके प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करतात.

दरम्यान आज पार पडलेल्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी चौके सरपंच राजा गावडे, उपसरपंच सौ. नाईक, चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ स्थानिक कमिटी अध्यक्ष बिंजेद्र गावडे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष कृष्णा चौकेकर, सुरेश चौकेकर, दत्ता गावडे, ग्रा. प. सदस्य मनोज चौकेकर, विजय चौकेकर , मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम, तसेच ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी श्री. संतोष गावडे, सुरेश चौकेकर, बिजेंद्र गावडे यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्यध्यापिका सौ. जाधव यांनी केले.

अभिप्राय द्या..