You are currently viewing जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस – आंबवणे शाळेचा शतक मोहत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न..

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस – आंबवणे शाळेचा शतक मोहत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न..

कणकवली /-

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस आंबवणे शाळेत १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शालेय उत्सव समिती अध्यक्ष संजय लाड,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन लाड आणि मुख्याध्यापक शेंगाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शाळेचा शतक मोहत्सव कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत ,प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस आंबवणे शाळेत प्रजासत्ताक दिनी हा कार्यक्रम संपन्न झाला.

शाळेमध्ये शतक मोहत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कणकवली येथील युवा उद्दोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री.निलेश गोवेकर उपस्थित होते त्यांच्या सोबत , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश चव्हाण ,मालवण राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष| सौ. नयना अनिकेत चव्हाण ,पोलीस पाटील किशोर लाड ,उत्सव समिती अध्यक्ष संजय लाड,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन लाड,जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा किर्लोस आंबवणे मुख्याध्यापक शेंगाळ सर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा