You are currently viewing शिरोडा भाजपच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार..

शिरोडा भाजपच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार..

वेंगुर्ला /-

मनिष दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बॅक शिरोडा शाखेला भेट देण्यासाठी पहिल्यादाच त्यांचे शिरोडा गावामध्ये आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पार्टी शिरोडा तर्फे शिरोडा गांधीचौक येथे फटाक्याची आतषबाजी करुन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिरोडा गावची ग्रामदेवता श्री देवी माऊलीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. यावेळी श्री देवी माऊली देवस्थान कमिटी शिरोडा तर्फे त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बॅक शिरोडा शाखेमध्ये त्यांचे आगमन झाले, यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.सिंधुदुर्ग अध्यक्ष मनिष दळवी यांचा भारतीय जनता पार्टी शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी व भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ,श्रीफळ देऊन व शाल घालून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिरोडा,रेडी,आरवली, सरपंच मनोज उगवेकर,रामसिंग राणे,तातोबा कुडव, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे,रेडी जि.प.सदस्य व माजी शिक्षण – आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,पं. स.
सदस्य मंगेश कामत,वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,माजी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष निकिता परब,शिरोडा ग्रामपंचायत सदस्य समृद्धी धानजी,प्राची नाईक,वेदिका शेटये,रेडी,शिरोडा,आरवली,सागरतीर्थ, शक्ती केंद्र प्रमुख,जगन्नाथ राणे,विदयाधर धानजी,महादेव नाईक,विजय बागकर, शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,अनिल गावडे,दादा शेटये,बाळकृष्ण परब,देऊ उर्फ आपा साळगांवकर,अमित गावडे,मयूरेश शिरोडकर,अशोक परब,बाबल गावडे,सुरेश परब,भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमकांत सावंत,तालुका कार्यकारी सदस्य महेश कोनाडकर,भाजप रेडी ग्राम कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर केरकर,उपाध्यक्ष ओंकार कोनाडकर,देवेंद्र मांजरेकर,सरचिटणीस गजानन बांदेकर,मच्छीमार आघाडी प्रमुख एकनाथ गवंडी, शिरोडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मनीष दळवीं सारखे युवा व अभ्यासू अध्यक्ष लाभणे ही सहकार क्षेत्रातील विकासाची नांदी होय.शिरोडा सारख्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये शेतकरी , मच्छिमार तसेच व्यावसायिक व उद्योजक यांना चांगल्या योजना द्वारे अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.नैसर्गिक आपत्ती व कोरोना सारख्या महामारी मुळे हतबल झालेल्या व आर्थिक दुर्बल कुटुंबासाठी शिक्षण व आरोग्यासाठी च्या विशेष योजना राबविण्यात याव्यात,अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली.यावेळी शेतकऱ्यांच्या प्रत्येक संस्थेस भेट देऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू.तसेच मागण्यांच्या दृष्टीने शेतीपूरक, पर्यटनपूरक व मत्स्यव्यवसायपूरक व्यवसायास प्राधान्य देण्याचा नक्कीच प्रयत्न करण्यात येईल.तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत व मार्गदर्शनाने त्यांच्या खात्याचा उपयोग करुन घेऊन येथील उद्योग वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील,असे मनिष दळवी म्हणाले.अध्यक्ष पदाचा बहुमान वेंगुर्ले तालुक्याला मिळवून दिल्या बद्दल भाजपा चे केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार रवींद्र चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.तसेच उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले अतुल काळसेकर यांचे व विद्यमान संचालक यांचे अभिनंदन करून त्यांना ही पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..