You are currently viewing संत राऊळ महाराज महाविद्यालयात २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदाता दिवस होणार साजरा..

संत राऊळ महाराज महाविद्यालयात २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदाता दिवस होणार साजरा..

जिल्हाधिकारी श्रीम. के.मंजूलक्ष्मी तसेच मुख्य कार्यकारी निवडणूक अधिकारी श्री.जयकृष्न फड यांची लाभणार प्रमुख उपस्थिती..

कुडाळ /-

२५ जानेवारी रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार तसेच निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा केला जाणार आहे.या कार्यक्रमास श्रीम.के.मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी
सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी निवडणूक अधिकारी श्री.जयकृष्न फड तसेच श्रीम. वंदना खरमाळे, SDO कुडाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच ते मतदान जागृती या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.सदर कार्यक्रमास मा.का.आ.सामंत, क.म.शि.प्र.मंडळ, कुडाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर क.म.शि.प्र.मंडळाचे अन्य सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थी हे कारोना नियमांचे पालन करून उपस्थित राहणार आहेत.

अभिप्राय द्या..