You are currently viewing महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;आरोपीच्या वतीने ऍड.अक्षय चिंदरकर यांनी केला युक्तिवाद..

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;आरोपीच्या वतीने ऍड.अक्षय चिंदरकर यांनी केला युक्तिवाद..

कणकवली /-

 कणकवली तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपी नागेश मधुकर कांबळे (32 शिवशक्तीनगर, कणकवली) याची कणकवली न्यायालयाने सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. 18 जानेवारी रोजी सायंकाळी 7.40 वाजता पीडित महिला ही आपल्या घरात असताना आरोपी नागेश कांबळे यांनी घरात येत विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली होती. तसेच यावेळी आरोपीला फिर्यादीने विरोध केला असता त्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार कणकवली पोलिसांनी भा. द. वि. कलम 354, 354 अ, 452, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीच्या वतीने ऍड. चिंदरकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने आरोपी नागेश कांबळे याची जामिनावर मुक्तता केली.

अभिप्राय द्या..