कणकवली

गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. यात यापूर्वी ४१ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी १० आणि बुधवारी ९ अशा आणखी १९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. एसटीच्या १०० हून अधिक फेऱ्या आता सुरू झाल्या आहेत. जसजसे कर्मचारी कामावर हजर होत आहेत, तसतशा फेऱ्या सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे गेले कित्येक महिन्यांपासून गैरसोय होत असलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे. तर बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा एस. टी. सेवेत येण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. या खेरीज कार्यशाळेतील ज्या कामगारांकडे अवजड वाहतूक परवाना आहे, त्यांना चालक नियुक्ती लवकरच दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page