You are currently viewing विजवितरणच्या बोगस कामाचा आठ दिवसांत करणार पर्दाफाश,पं.स.सदस्य मंगेश लोके यांचा इशारा.

विजवितरणच्या बोगस कामाचा आठ दिवसांत करणार पर्दाफाश,पं.स.सदस्य मंगेश लोके यांचा इशारा.

वैभववाडी /-

पंचायत समिती मासिक सभेट वीज वितरणच्या कारभारावर सदस्य मंगेश लोके व सदस्या हर्षदा हरयाण या आक्रमक झाल्या. वीज वितरण विभागाचा बोगस कारभार सुरू आहे. या विभागामार्फत गोरगरिबांची पिळवणूक चालली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या विभागाच्या कामकाजाचा पर्दाफाश करणार, असा इशारा सदस्य मंगेश लोके यांनी दिला आहे. वीज वितरणच्या कामावर सदस्या हर्षदा हरयाण यांनी देखील नाराजी व्यक्त केली. वीज मीटरची कमी युनिट आली तर हा विभाग तपासणी करतो. मग ज्या ग्राहकांचे जास्त युनिट होतात त्यांची तपासणी का होत नाही, असा सवाल हरयाण यांनी उपस्थित केला. वीज बीलांवर वेगवेगळे कर लावून भरमसाठ बीले दिली जातात, असा आरोप हरयाण यांनी केला. त्यानंतर वीज वितरणने आपल्या कारभारात सुसूत्रपणा आणावा, अशी सूचना उपसभापती अरविंद रावराणे यांनी दिली.

अभिप्राय द्या..