You are currently viewing माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सहविचार सभेचे आयोजन करावे,शिक्षक भारतीची मागणी!

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सहविचार सभेचे आयोजन करावे,शिक्षक भारतीची मागणी!

सिंधुदुर्ग/-

शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरु होऊन सात महिने निघून गेले तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत अद्यापपर्यंत एकाही सहविचार सभेचे आयोजन झालेले नाही. त्यामुळे शिक्षक संघटना संभ्रमात आहेत. शैक्षणिक वर्ष चालवत असताना त्यामध्ये शिक्षक संघटनांचाही वाटा तेवढाच महत्त्वाचा असतो. याचा विचार करून लवकरात लवकर सहविचार सभेचे आयोजन करावे व मागील सभेचे इतिवृत्त पाठवावे, अशी लेखी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा