You are currently viewing वर्षभरात ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करणार.;पालकमंत्री सामंत

वर्षभरात ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करणार.;पालकमंत्री सामंत

कणकवली / –

पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ओसरगाव तलाव ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि डीपीडिसी च्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करणार. यासाठी आपणास पुन्हा उपोषण करावे लागणार नाही असा शब्दही पालकमंत्री सामंत यांनी बबली राणे यांना दिला. यावेळी कोकण सिंचन महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, डॉ. बाबा मोहिते, वाय.जी. राणे, सुशांत मोहिते, सत्यविजय राणे, श्रेया राऊत, साक्षी चव्हाण, दर्पण रासम, जीवन चव्हाण, चिनार राणे, दिव्या राणे, सुमन चौकेकर, ताती परब, भगवान आलव, संकेत राणे आदींसह ओसरगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..