You are currently viewing वायंगणी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन बाप-लेकाचा जागीच मृत्यू

वायंगणी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन बाप-लेकाचा जागीच मृत्यू

वेंगुर्ला /-

घरात सिलेंडरचा स्फोट होऊन बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी- बागायतवाडी येथे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९) अशी त्या दुर्दैवी बाप- लेकाची नावं असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सुदैवाने वसंत यांची पत्नी मासे विकण्यासाठी बाहेर गेल्यामुळे ती अपघातात वाचली आहे. दुर्घटनेत त्यांचे घर अर्धे जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत वसंत फटनाईक यांना काही दिवसापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे प्रकृती खालावल्याने ते घराबाहेर पडत नसत. तर त्यांचा मुलगा गणेश हा वडीलांची देखभाल करण्यासाठी घरी असायचा. वसंत यांची पत्नी मासे विक्री करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होती. ती नेहमीप्रमाणे आज सकाळी मासे विक्री करण्यासाठी वेंगुर्ले बाजारपेठेत गेली होती. तर वसंत व गणेश हे बाप – लेक दोघेच घरात होते. त्यांच्या घराशेजारी जेवण बनविण्यासाठी पडवी बांधण्यात आली होती. त्या ठिकाणी हा सिलेंडरचा स्फोट झाला आहे. वेंगुर्ले अग्निशमन दलाचा बंब, वेंगर्ले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असन अधिक तपास सुरू आहे.

अभिप्राय द्या..