You are currently viewing पशुसंवर्धन विभागाच्या पात्र लाभार्थ्याना कागदपत्रे सादर करण्यास १९ जानेवारी अंतिम मुदत.;जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शिंपी यांची माहिती

पशुसंवर्धन विभागाच्या पात्र लाभार्थ्याना कागदपत्रे सादर करण्यास १९ जानेवारी अंतिम मुदत.;जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शिंपी यांची माहिती

ओरोस /-

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांचे लाभार्थ्यांनी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने निवड झालेल्या व प्रतिक्षाधीन लाभार्थ्यांनी डॉक्यूमेंट्स अपलोड करण्याची सुविधेस 19 जानेवारी 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या बाबत सर्व संबंधित पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचे मार्फत लाभार्थ्यांना सदर बाबत मेसेज, दुरध्वनी जाईल याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ दिलीप शिंपी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..