You are currently viewing मालवण पत्रकार समितीतर्फे साळेल येथे वनराई बंधारा उभारणी,साळेल ग्रामपंचायत व प.स. सदस्य कमलाकर गावडे यांचे सहकार्य..

मालवण पत्रकार समितीतर्फे साळेल येथे वनराई बंधारा उभारणी,साळेल ग्रामपंचायत व प.स. सदस्य कमलाकर गावडे यांचे सहकार्य..

मालवण /-

मालवण पत्रकार समिती, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, साळेल ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या
संयुक्त विद्यमाने साळेल गावातील लिंगेश्वर मंदिर येथील ओहोळावर रविवारी वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधारा उभारणीमुळे ७ ते ८ एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

यावेळी मराठी पत्रकार परिषद कोकण विभाग सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा पत्रकार संघ सदस्य विद्याधर केनवडेकर, ज्येष्ठ पत्रकार राजा खांडाळेकर, मालवण पत्रकार संघ अध्यक्ष संतोष गावडे, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, अमोल गोसावी, मनोज चव्हाण, अमित खोत, महेश कदम, कुणाल मांजरेकर, आप्पा मालंडकर, नितीन गावडे, विशाल वाईरकर, महेश सरनाईक, प्रशांत हिंदळेकर, सौगंधराज बांदेकर आदी उपस्थित होते. सर्वच पत्रकारांनी खोरे, कुदळ, घमेले घेऊन माती खणून पिशव्यांत भरत उपस्थित ग्रामस्थांच्या मार्गदर्शनातून बंधाऱ्यांची उभारणी केली. यावेळी ग्रामसेवक अशोक पाटील, उपसरपंच रवींद्र साळकर, सदस्य भांजी गावडे, रोशन गावडे, शिवराम गावडे, मंगेश गावडे, संतोष गावडे, गणेश गावडे आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

या बंधारा बांधणीमुळे परीसरातील विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढणार आहे. कुळीद, नाचणी, वाल, चवळी व अन्य भाजी पीक तसेच माड बागायतीलाही फायदा होणार आहे, असा विश्वास कमलाकर गावडे यांनी वक्त करत उपस्थित पत्रकार मित्रांचे गावाच्या वतीने आभार मानले. तर मालवण पत्रकार समितीच्या वतीने तालुक्यात आगामी काळातही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील, असे यावेळी माहिती मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..