You are currently viewing मळेवाड येथील श्री नाईकवस देवाचा जत्रोत्सव १८ जानेवारीला

मळेवाड येथील श्री नाईकवस देवाचा जत्रोत्सव १८ जानेवारीला

सावंतवाडी /-

मळेवाड जकातनाका येथील श्री नाईकवस देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार १८ जानेवारी रोजी साजरा होणार आहे यानिमित्त सकाळी ब्राम्हणांच्या हस्ते धार्मिक विधीवत पूजा, केळी, नारळ ठेवणे, गाऱ्हाणे घालणे आदी कार्यक्रम होणार असून रात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..