You are currently viewing ९ गुंठे जागेत होणार छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,उर्वरित जागेत स्टॉलधारकांचे पुनर्वसन.;पालकमंत्री उदय सामंत.

९ गुंठे जागेत होणार छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,उर्वरित जागेत स्टॉलधारकांचे पुनर्वसन.;पालकमंत्री उदय सामंत.

 
कणकवली /-

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आज पुन्हा भेट दिली. त्यावर तोडगा काढताना १८ गुंठे जागेतील ९ गुंठे जागा शिवस्मारकासाठी तर उर्वरित जागा पुनर्वसनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्टॉलची मापे व असलेल्या स्टॉल धारकांची यादी निश्चित करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, कणकवली नगरपंचायत किशोर धुमाळे, भूमी अभिलेखचे श्री. परब आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, भाई परब, बच्चू प्रभुगावकर, शेखर राणे, संदीप सावंत, सुशील सावंत, सुशांत दळवी, रामदास विकाळे, राजू पारकर, शैलेश भोगले, महेंद्र ज्ञानेश्वर दिपणाईक,मनोज हिर्लेकर आदींसह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..