You are currently viewing शिरंगे पुनर्वसन श्री देवी सातेरी भावईचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १३  जानेवारीला.

शिरंगे पुनर्वसन श्री देवी सातेरी भावईचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १३ जानेवारीला.

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसीत झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक १३/०१/२०२२ रोजी साजरा होणार आहे. तसेच ओटी भरणे,देवीची आरती, तसेच रात्रौ मामा मोचेमाडकर यांचे दशावतारी नाटक होणार अशा अनेक कार्यक्रमानिशी जत्रोत्सव साजरा होणार असून कोरोना संदर्भात शासनाने घातलेले सर्व नियम पालन करत हा जत्रोत्सव होणार असल्याची माहिती शिरंगे पुनर्वसन मधील श्री देवी सातेरी भावई देवस्थान समितीने दिली आहे तसेच येणाऱ्या सर्व भाविकांनी देखील कोरोना संदर्भात असलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील देवस्थान समितीने केले आहे.

अभिप्राय द्या..