You are currently viewing पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने महामृत्युंजय जपाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने महामृत्युंजय जपाचे आयोजन

वेंगुर्ला /-


पंजाब दौऱ्यावर असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षीततेत पंजाब मधील काँग्रेस सरकारने कुचराई केली यासाठी शत्रूच्या षडयंत्रापासुन त्यांचे रक्षण व्हावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी महामृत्युंजय जपाचे आयोजन करण्यात आले होते.महामृत्युंजय जपाचे पौरोहित्य विश्व हिंदु परिषद , वेंगुर्लेचे प्रखंड प्रमुख अरुण गोगटे यांनी केले. यावेळी पुरोहित म्हणून ब्राम्हण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत रानडे, कीरण ताम्हणकर,अजित दामले, मयुरेश फाटक, कौशल नातु यांनी महामृत्युंजय जपाचे पठण केले.यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व महिला मोर्चा च्या ता.सरचिटणीस वृंदा गवंडळकर यांनी गणेश पुजन करून महामृत्युंजय जपाची सुरुवात केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप,माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, महिला मोर्चा च्या अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, माजी नगराध्यक्षा डाॅ.पुजा कर्पे, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल व बाळा सावंत,माजी नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी , विश्व हिंदु परिषदेचे महामंत्री आपा धोंड, आशिष पाडगावकर,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटनीस समीर कुडाळकर , ता.का.का.सदस्य बिट्टु गावडे , किसान मोर्चा चे ज्ञानेश्वर केळजी, महिला मोर्चा च्या रसीका मठकर – वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..