मसुरे /-
मालवण तालुक्यातील पळसंब शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पळसंब गावामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘शाळे बाहेरील शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील चिंदरकर घर , दशरथ सावंत घर, दिवाकर पुजारे घर , नाखरे घर आणि मंडळाची इमारत अशा पाच ठिकाणी शाळेबाहेरील शाळा उपक्रम चालू करण्यात आला आहे.
तसेच मुलाना शैक्षणीक , कला , कार्यानुभव , संगीत इत्यादी विषयातील मार्गदर्शनासाठी गावातील शिक्षित युवक, युवती, ग्रामस्थ यानी सहभाग घेतला आहे.
शिक्षक स्वयसेवक म्हणून इयत्ता सातवी, सहावी साठी स्नेहा नाखरे , प्रांजल परब ,पाचवीसाठी पंकज सावंत , रोशन चिचंवलकर , प्रथमेश सावंत चौथी साठी आरती परब , धनश्री पुजारे, अनुष्का सावंत तिसरी साठी -प्राची पळसंबकर, वृषाली पुजारे, दूसरी साठी ऋतूजा पुजारे , दिप्ती पुजारे,पहिली साठी ईशा मुणगेकर , प्राजक्ता. सावंत ,पूजा वरक, ऐश्वर्या चव्हाण,तर कार्यानुभव – संदेश सावंत तबला संगीत – प्रथमेश वाघ, निखिल सावंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तसेच मुख्याध्यापक सावंत मॅडम , असरोडकर मॅडम , पवार मॅडम , शाळा अध्यक्ष रविकांत सावंत आणि समिती याच्या मार्गदर्शनाने शाळेबाहेरील शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे अशी माहिती सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिली.