दोडामार्ग /-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दोडामार्ग तालुक्याचे पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्ग अपडेट न्यूज चे संपादक शिरीष नाईक यांना जाहीर करण्यात आला तर युवा पत्रकार पुरस्कार डी एस एन चे संपादक प्रमोद गवस यांना आणि उदयोन्मुख पुरस्कार गोविंद शिरसाट यांना जाहीर झाला.
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या वृत्त पत्राच्या वर्धापनदिन “पत्रकार दिनाच्या” निमित्ताने ६ जानेवारी रोजी दोडामार्ग येथे ह्या पुरस्काराचे वितरण होणार आहे. हे पुरस्कार निवडीसाठी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व जिल्हा कार्यकारिणी,दोडामार्ग तालुका अध्यक्ष तुळशीदास नाईक, खजिनदार सुमित दळवी व सचिव प्रशांत गवस यांनी विशेष काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page