You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात २९ मुलांचे कोव्हक्सिन लसीकरण.

वेंगुर्ले तालुक्यात २९ मुलांचे कोव्हक्सिन लसीकरण.

वेंगुर्ला /-

१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यानुसार ३ जानेवारी पासून सुरु झालेल्या लसीकरणात वेंगुर्ले तालुक्यात माऊली विद्यामंदिर रेडी येथे झालेल्या लसीकरणात २९ मुलांचे कोव्हक्सिन लसीकरण करण्यात आले.
जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, रेडी उपसरपंच राणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर,रेडी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा नवार,डॉ.रश्मी शुक्ल,तालुका वि za s fcस्तार अधिकारी गोसावी,एस.पी.परब,समुदाय आरोग्य अधिकारी अंकिता तोरसकर,आरोग्यसेवक एम.व्ही.गवंडे, आरोग्यसेविका पी.पी.गावडे, आशासेविका अश्विनी मेस्त्री यांच्या उपस्थितीत हे लसीकरण संपन्न झाले.

अभिप्राय द्या..