You are currently viewing ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ६ जानेवारीला छेडणार लाक्षणिक उपोषण…

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ६ जानेवारीला छेडणार लाक्षणिक उपोषण…

सावंतवाडी /-

कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या उर्वरित रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे ती रक्कम तात्काळ मिळावी, या मागणीसाठी संघटनेच्यावतीने ६ जानेवारीला लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष हनुमान केदार यांनी दिला आहे.याचे निवेदन सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.

अभिप्राय द्या..