You are currently viewing कवठी निरुखे वाडी ते माऊली मंदिर रस्ता ग्रामसडक योजनेंतर्गत होणेसासाठी खा.राऊत आ.नाईक यांची शिफारस

कवठी निरुखे वाडी ते माऊली मंदिर रस्ता ग्रामसडक योजनेंतर्गत होणेसासाठी खा.राऊत आ.नाईक यांची शिफारस

शिवसेना शिष्ठ मंडळाने घेतली पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अभियंता श्री माळगावकर यांची भेट..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील कवठी निरुखे वाडी ते माऊली मंदिर रस्ता गावाच्या मुख्य वाड्यांमधुन जाणारा रस्ता गेली बरीच वर्षे नादुरुस्त झाल्याने तो पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत घ्यावा अशी शिफारस खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी दीली असल्याने तसे पत्र पंतप्रधान ग्रामसडक योजनेंचे श्री माळगावकर यांच्या कडे आज शिवसेना शिष्ठ मंडळाने दीले.

यावेळी शिष्ठ मंडळात शिवसेनेचे अतुल बंगे, कवठी सरपंच रुपेश वाड्येकर, शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत तेंडोलकर, शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, कवठी ग्रामस्थ मनिष वाड्येकर, आबा म्हापणकर यांनी श्री माळगावकर यांचे लक्ष वेधताना सांगितले की कवठी ते चेंदवण निरुखे वाडी रस्ता माऊली देवी मंदिराकडे बाहेर पडला हा रस्ता होता त्यामुळे दळवळण साधन होती व ग्रामस्थ यांना व वाहनधारक यांना सोयीचे होते आता सदर रस्ता पुर्ण खराब झाल्याने वाहनाने येणे गैरसोयीचे झालेले आहे त्यामुळे हा रस्ता होणे फार गरजेचे आहे यासाठी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी कोणत्याही परिस्थितीत सदर रस्ता या वर्षी आराखड्यात घेऊन पुर्ण केला जाईल यासाठी शिफारस केली आहे त्यामुळे सदर रस्ता पहाणी करुन अंदाज पत्रक तयार करुन किमान काम मार्गी लागावे यासाठी प्रयत्न केले जावेत अशी मागणी श्री रुपेश वाड्येकर यांनी केली.

अभिप्राय द्या..