कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस ची आघाडी करुन निवडणूक लढवत आहेत, सहकार समृद्धी पॅनलचे सर्व उमेदवार हे सहकारातील जाण असलेले उमेदवार आहेत, जिल्हा बँकेचा निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून मतदारामधून सहकार समृद्धी पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने, विरोधी पॅनलच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने विरोधकांकडून जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याचे घाणेरडे प्रकार सुरू झालेले आहेत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार हे नेहमीच सहकारमहर्षी कै,शिवराम भाऊ जाधव कै,डी, बी.ढोलम यांच्या सहकारातील विचारांचा आणि योगदानाचा आदर्श समोर ठेवून यापूर्वीच्या जिल्हा बँक निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला भरघोस मतदान करून जिल्हा बँक ताब्यात दिली.त्या जिल्हा बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी आता पर्यंत लोकाभिमुख कामकाज करून कै, शिवराम भाऊ जाधव व कै,डी.बी.ढोलम यांच्या पश्चात त्यांच्या सहकारातील विचारांचे आदर्शवत काम करून सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रात अग्रस्थानी उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत व उपाध्यक्ष सुरेशभाई दळवी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालक मंडळाने करून सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांचीच आहे,हे महाराष्ट् राज्यात अधोरेखित केले असुन विद्यमान संचालक मंडळाने बॅंकेचे मतदार, सभासद, शेतकरी यांचा विश्वास संपादन केलेला आहे,कै,भाईसाहेब सावंत,कै, केशवराव राणे. कै, शिवराम भाऊ जाधव व डी. बी.ढोलम यांच्या अथक परिश्रमाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे रोपटे लावले त्यांच्याच कारकीर्दीत त्या रोपट्याचे सहकार म्हणून वटवृक्षात रूपांतर केले,आज या वटवृक्षाच्या सावलीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शेतकरी वर्ग समृद्ध झालेला निदर्शनास येत आहे,हीच घोडदौड पुढे चालू ठेवण्यासाठी सहकार समृद्धी पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणे ही कै,भाईसाहेब सावंत,कै, केशवराव राणे. कै, शिवराम भाऊ जाधव‌ डी. बी.ढोलम यांच्या सहकार विचारांना खरी श्रद्धांजली ठरेल,

जिल्हा बँक येन केन प्रकारे ताब्यात घेण्यासाठी व समोर पराभव दिसत असल्याने विरोधी पॅनलच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळे जिल्ह्यात मतदारांमध्ये दहशत निर्माण करून मतदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत,हा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही,तसेच मतदारांना विविध प्रकारच्या प्रलोभनांची आश्वासने दिली जात आहेत,सुज्ञ मतदार ही प्रलोभने झुगारून महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून सिंधुदुर्ग जिल्हा बँक सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतील.आणि तो आनंदी क्षण ३१ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शेतकरी, कष्टकरी, सहकार क्षेत्र.बॅकेचे सभासद यांचा असेल,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page