You are currently viewing माणगाव कार्यरत तलाठी व पूर्व कार्यरत मंडळ अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू…

माणगाव कार्यरत तलाठी व पूर्व कार्यरत मंडळ अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू…

खत दस्त नाव नोंदींत विसंगत कारभार,तात्काळ कारवाई करा,कुडाळ तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

कुडाळ /-
तालुक्यातील माणगावातील कार्यरत तलाठी व पूर्व कार्यरत मंडळ अधिकारी याचेवर कारवाई करणे बाबत संदर्भात पूर्व मंडळ अधिकारी व कार्यरत तलाठी यांनी कर्तव्यात कसूर अशा प्रकारच्या गुन्ह्यास पात्र कारभार, केलेला आहे .याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे वारंवार आपल्या दरबारी केली आहे. कार्यरत मंडळाधिकारी यांनी तक्रार तथा अहवाल कारवाई सादर करण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढू धोरण अवलंबले आहे. दस्त नाव नोंदणी कर्ज बोजा चढविणे जावक क्रमांक न टाकता पत्रव्यवहार करणे दिशाभूल लेखी स्वरुपात उत्तर देणे अपील निर्णय चुकीचा तथा कायद्याचा भंग करणारा देणे इत्यादी तसेच महसूल विभागाच्या विसंगत तथा गंभीर, पात्र कारभार करणे याबाबत सबळ पुरावे माझ्या जवळ आहेत. दस्त नाव नोंदी विषयी माहिती देण्यात वारंवार वेगवेगळे उत्तरे दिली जात आहे. त्यात विसंगत दोष पात्र कारभार समोर येईल या भीतीने आताही दोष पात्र उत्तरे दिली जात आहे. ता मात्र माणगाव वासियांना महसूल विभाग दोष पात्र कारभाराचा सहनशक्तीचा बांधव फुटला आहे पुढील पंधरा दिवसात आपल्या दरबारी संबंधित अधिकारी तक्रारदार यांची सुनावणी आयोजित करून दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर महसूल विभाग पीडित ग्रामस्थांना घेऊन घंटानाद आंदोलन करण्यात येईल.असा इशारा सचिव सावंत यांच्या कडून देण्यात आला आहे

अभिप्राय द्या..