स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतीसाद..

बांदा /-


शहरातील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा मध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशन,श्री.साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व गणेश राउळ मित्र मंडळ यांच्या सयुक्त विद्यमानाने आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमाचे उद्घाटन बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी व बांदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक शामराव काळे यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन झाले.
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशनचे महीला जिल्हा अध्यक्षा सौ.दर्शना केसरकर , उपाध्यक्ष मिलींद धुरी,आनंद कांडरकर,श्री साईबाबा भक्तसेवा मंडळचे अध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर,विश्वस्त साईराज सांळगावकर, सांळगावकर,खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर,पि.एस.सावंत मान्यवर उपस्थित होते. या वेळी तिमिरातुन तेजाकडे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री सत्यवान रेडकर यांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेएशनच्या वतीने शाल ,श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांच्या हस्ते सन्मान केला.या कार्यक्रम अध्यक्ष काळे यानी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येक विद्यार्थानी जिद्द ठेवुन, स्पर्धा परीक्षेची तयारी करून व मेहनत घेऊन यश संपादन केले पाहीजे.आपण इंजीनीयर,डॉक्टर,आय पी एस , कलेक्टर बनुन आपल्या वडीलांच, गावाच नाव उज्वल करा.तलाठी वर्षा नाडकर्णी यानी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या,व शासकीय अधिका-याच गाव मार्गदर्शक सत्यवान रेडकरच स्वन्प पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. मुख्याध्यापक पावसकर सरानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी जिवनात फार महत्वाचे आहे. यातुन तुम्ही आपले यशस्वी जीवन घडवु शकता.मार्गदर्शक रेडकर यानी आपण कसा घडलो प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी मेहनत करा जिद्द उराशी बाळगा व सरकारी अधीकारांचे गाव हे माझ स्वन्प पूर्ण करा,या कार्यक्रमाच्या शेवटी अनेक विद्यार्धि , विद्यार्थिनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करून रेडकरांचे आभार व्यक्त करुन उस्फुर्त प्रतिसाद दिला. राकेश केसरकर मान्यवरांचे आभार मानले ,कार्यक्रमाचे सुसंचालन पि.एस सावंत यानी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page