You are currently viewing हुमरमळा ते वालावल रस्त्यासाठी खा. राऊत आ.नाईक यांनी दीले एक कोटी अठ्ठावीस लाख! भुमीपुजन संपन्न..

हुमरमळा ते वालावल रस्त्यासाठी खा. राऊत आ.नाईक यांनी दीले एक कोटी अठ्ठावीस लाख! भुमीपुजन संपन्न..

कुडाळ /-

हुमरमळा ते वालावल रस्त्यासाठी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती मागणी या मागणीचा विचार करुन सदर रस्त्यासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी देऊन कामाचा शुभारंभ आज हुमरमळा गावातील प्रतीयश उद्योजक श्री बबन सावंत यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.

वालावल आणि हुमरमळा ही दोन गावे पर्यटन दृष्टीने महत्त्वाची असल्याने पर्यटक व भावीक मोठ्या प्रमाणात येत असतात आमदार वैभव नाईक यांनी हुमरमळा आणि पंचक्रोशीत कवठी, चेंदवण, वालावल, पाट या रस्त्यांसाठी अनेक योजनांमधून कोट्यांनी रुपयांचा निधी दीलेला आहे यातच वालावल ते हुमरमळा हा रस्ता अतिशय खराब झाल्याने शिवसेनेचे अतुल बंगे, युवासेनेचे वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर, सरपंच सौ अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहलदीप सामंत युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव, शाखाप्रमुख रमेश परब यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कडे निधीची मागणी केली होती त्यानुसार खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी संपुर्ण रस्ता एकाच वेळी व्हावा या हेतूने मोठा निधी दीला रस्त्याचे काम सावंतवाडी येथील ठेकेदार दीलीप नार्वेकर यांनी रस्त्याचे काम उत्कृष्ट केले आहे यावेळी ग्रामस्थ ठेकेदार चांगले काम करीत असल्याने समाधान व्यक्त केले यावेळी आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांचे आभार मानले यावेळी अतुल बंगे, मितेश वालावलकर, युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव, शाखाप्रमुख रमेश परब, उपसरपंच स्नेहलदीप सामंत, गुंडु परब, उमेश कानडे, दीपक चव्हाण, सचिन पेडणेकर, अमित सावंत, बबन सावंत, प्रा मयुर प्रभु, धिरज मयेकर, सागर परब, गुरु परब, सचिन वालावलकर अनिकेत गुंजकर, प्रकाश परब, बाळा परब, ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा