You are currently viewing शिक्षक हा समाजाचा अभियंता आहे.;डॉ.दीपाली काजरेकर..

शिक्षक हा समाजाचा अभियंता आहे.;डॉ.दीपाली काजरेकर..

बॅरिस्टर नाथ पै बी.एड .कॉलेजमध्ये डी.एस.एम., एम .ए.एज्युकेशन गुणवंत विद्यार्थी -शिक्षकांचा गौरव..

कुडाळ /-

शिक्षक हा समाजाचा अभियंता आहे. शिक्षक समाजापर्यंत गेला पाहिजे; तर च शाळा हा समाजाचे केंद्र होईल. त्यासाठी विज्ञाननिष्ठ शिक्षण द्या .शिक्षण विद्यार्थी निष्ठ व विद्यार्थी विज्ञाननिष्ठ असला पाहिजे आणि ज्ञान हे समाजनिष्ठ असले पाहिजे आणि समाज समताधिष्टीत असला पाहिजे. असे उद्गार दीपाली काजरेकर यांनी काढले .त्या कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै अध्यापक महाविद्यालया मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका व एम ए एज्युकेशन पदवी अभ्यासक्रमातील गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “काळाची गरज ओळखून शिक्षकाने स्वतः बदलले पाहिजे .विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने परिपूर्णतेने सामोरे गेले पाहिजे. शिक्षकांकडे आदर्श म्हणून पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी आपण आदर्शभूत असले पाहिजे. कारण विद्यार्थ्याला जीवनाचे धडे शाळेतून मिळत असतात .यासाठी पुस्तकाच्या पलीकडले शिक्षण द्या. ते खरे शिक्षण आहे “.असे म्हणत विद्यार्थीनिष्ठ शिक्षणाची गरज, अध्ययन हे लोकशाही नागरिक घडविणारे असले पाहिजे .असे सांगत शिक्षकाचे व्यक्तिमत्व प्रभावी असते पाहिजे. शिकण्याची इच्छा असेल तर नवीन काहीतरी सतत मिळत असते. शिक्षक हा खऱ्या मानाचा मानकरी आहे. कारण तो चांगले ज्ञान देतो. विद्यार्थ्यांना स्वतःचा विकास करण्याची प्रेरणा शाळांतून मिळते. म्हणून प्रत्येक मूल हे आपलं एक दान की समजून आपण माळ्याचे काम केले पाहिजे .तरच त्याचे जीवन सुजलाम सुफलाम होऊ शकते. असे मार्गदर्शन केले .या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक येजरे, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै बी.एड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, समंत्रक तथा केंद्र समन्वयक प्रा.नितीन बांबर्डेकर,प्रा. योगिता शिरसाट, समंत्रक श्री .मसुरकर इत्यादी उपस्थित होते .देवी सरस्वती ,यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना अशोक येजरे यांनी “शिक्षण हे मानवी जीवनाला लाभलेले अमृतमय वरदान आहे. शिक्षण हे समाज उपयोगी असले पाहिजे .घेतलेले शिक्षण कधी फुकट जात नाही .शिक्षक या नात्याने आपण सतत जागरूक असले पाहिजे. शिक्षकाचे असे कार्य असावे की शिक्षकाच्या नावाने त्या शाळेची ओळख व्हावी .यासाठी तनमनधन अर्पून शिक्षकाने कार्यरत राहिले पाहिजे. आजच्या काळात व्यावसायिक शिक्षणावर भर दिला पाहिजे .”असे सांगत यशस्वी- गुणवंत शिक्षकांचे कौतुक केले व शालेय व्यवस्थापन पदविका,एम ए एज्युकेशन पदवी साठी प्रवेश घेतलेल्यांना शुभेच्छा दिल्या. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी “कोणत्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असते. चांगलं काम रणार्‍यांच्या मार्गात अडथळे आणणारे बरेच असतात; त्या अडथळ्यांचा विचार न करता आपण अंगीकारली केलेले कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडायचे असते. सामाजिकता संघर्षातून घडत आहे.अडथळे, समस्या या सगळ्यावर मात करत संस्थेने, शिक्षण व्यवस्थेने आणि शिक्षकांनी पुढे जायचे आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे जे काही यश आहे ते निष्ठेने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे यश आहे “. शिक्षणासाठी व सामाजिकतेचे भान ठेवून काम करणाऱ्यांसाठी नेहमी संस्थेची दारे खुली असतील”. असे सांगत गुणवंत शिक्षकांचा सत्कार’ अभिनंदन करत नवे प्रवेशित शिक्षकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य अरुण मर्गज यांनी” शिक्षक हा सामाजिक व्यवस्थेचा कणा आहे. तो आदर्शवादी असला पाहिजे. त्याचे जीवन हे इतरांसाठी आदर्शवत असले पाहिजे. त्यांचे जीवन हे इतरांसाठी संदेश असलं पाहिजे. विद्यार्थी घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांकडे आहे याचे भान ठेवून कार्य केल्यास समाज मान्यता व लोकप्रियता दूर नसते. असे सांगत शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चार्य परेश धावडे यांनी शिक्षक व विद्यार्थी हे असंतुष्टच असले पाहिजे तरच ते नवीन नवीन ज्ञानात पदवी संपादन करू शकतात हे सांगत शालेय व्यवस्थापन पदविका व एम ए एज्युकेशन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले व अभ्यासक्रमाची थोडक्यात ओळख करून दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने सुमंत दळवी, सुरेखा प्रभुखानोलकर, चिपकर अनिकेत सावंत, मानसी नेवगी यांनी मनोगत व्यक्त केली उत्तम अभ्यासक्रमाचे उत्तम मार्गदर्शक व उत्तम शिक्षण संस्था असलेल्या या केंद्रावर एम ए एज्युकेशन सारखी व डीएसएम सारखी पदवीका संपादन करण्याची संधी मिळाली याबद्दल स्वतःला भाग्यवान समजून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता शिरसाट यांनी तर प्रास्ताविक प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले. यावेळेला बहुसंख्येने विद्यार्थी -शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रसाद कानडे, पांडूरंग पाटकर, प्राची बर्वे ,शामल कुंभार, सुनिल गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले.

अभिप्राय द्या..