You are currently viewing आंदुर्ले खिंड येथे सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या व्यथा पालमंत्र्यांनी घेतल्या ऐकुन.;पाट पिंगुळी रस्ता काम सुरू करण्यास दीरंगाई नको साबाच्या अधिका-यांना पालमंत्र्यांनी खडसावले!

आंदुर्ले खिंड येथे सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या व्यथा पालमंत्र्यांनी घेतल्या ऐकुन.;पाट पिंगुळी रस्ता काम सुरू करण्यास दीरंगाई नको साबाच्या अधिका-यांना पालमंत्र्यांनी खडसावले!

कुडाळ /-

कुडाळ पिंगुळी पाट रस्त्याचे काम गेल्या विमानतळ उद्घाटन पुर्वी होणे आवश्यक असताना ते रखडलेले काम पुर्ववत सुरू व्हावे या मागणी साठी आज पालकमंत्री ना उदय सामंत चिपी विमानतळ येथुन कुडाळ येथे जाणार असल्याने आंदुर्ले खिंड येथे सर्व पक्षीय ग्रामस्थांनी भेट घेऊन रस्ता सुरु करण्यास चाल ढकलपणा आणि साबा अधिका-यांची बेजबाबदार उत्तरे याचा पाढाच पालकमंत्री ना उदय सामंत यांच्या समोर वाचला यावेळी पालकमंत्री ना सामंत यांनी ठेकेदार डाके तसेच सा बा कार्यकारी अभियंता अनामिका जाधव तसेच रत्नागिरी सा बा अधिकारी यांना ग्रामस्थांसमवेत स्पिकर वर मोबाईल ठेवुन फेस टु फेस बोलुन पालकमंत्री ना सामंत यांनी खडसावले आता कोणतेही कारण चालणार नसुन लोकांच्या जिविताशी खेळत असाल तर गाठ माझ्याशी आहे असे खडे बोल सुनावत येत्या महीन्या आत पाट पिंगुळी रस्ता पुर्ण झाला नसेल तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम ना सामंत यांनी दीला यावेळी माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांनी पालकमंत्री ना उदय सामंत यांचे स्वागत करत आभार मानले यावेळी शिवसेनेचे संजय पडते, अतुल बंगे, जगन्नाथ म्हापणकर, पाट माजी सरपंच सौ किर्ती ठाकुर, आंदुर्ले माजी उपसरपंच सौ आरती पाटील, राजेश सामंत, विलास आरोलकर, रत्नाकर प्रभु व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..