कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयाचे उदघाटन…

कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयाचे उदघाटन…

सावंतवाडी /-

प्रा.रमेश चिटणीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये प्रा.रमेश चिटणीस यांच्या नावाने ग्रंथालयाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.प्रा.जी.ए.बुवा सर यांनी फित कापून या ग्रंथालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी यशवंतराव भोसले नाॕलेज सीटीचे अध्यक्ष श्री.अच्यूतराव भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.

ग्रंथालयाचे महत्त्व तसेच वाचनाचे महत्त्व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एन.पी.मानकर सर यांनी प्रास्ताविकात नमुद केले. ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन उदघाटक श्री. बुवा सर यांनी केले. प्रमुख पाहुणे श्री.अच्यूतराव भोसले यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे सदस्य तथा चिटणीस सरांचे नातू श्री.गौरांग चिटणीस यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला.संस्थेचे अध्यक्ष श्री.शैलेश पै यांनी वाचनालयाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. तसेच ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला.

सदर ग्रंथालय शाळेच्या माजी विद्यार्थी,शिक्षक आणि हितचिंतकांनी दिलेल्या देणगीतून उभारण्यात आले असून यापूर्वी श्री.गोविंद वाडकर यांच्या सेवासमाप्ती कार्यक्रमात जाहीर झालेले देणगी संस्थेकडे प्राप्त झाल्यानंतर सदर ग्रंथालयाचे काम अधिक चांगले करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.मानकर सर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रदीप सावंत,संस्थेचे सचिव श्री.प्रसाद नार्वेकर,श्री.गौरांग चिटणीस , सौ.राजश्री टिपणीस मॕडम,श्रीम.श्रध्दा नाईक मॕडम , श्री.गोठोस्कर सर, चिटणीस कुटुंबीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक, प्रशालेचे हितचिंतक,पत्रकार उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल ठाकूर यांनी केले.

अभिप्राय द्या..