You are currently viewing केसरी शाळेत दिव्यांग दिनानिमित जगण्याची आशा उपक्रमाचे आयोजन.

केसरी शाळेत दिव्यांग दिनानिमित जगण्याची आशा उपक्रमाचे आयोजन.

सावंतवाडी /-


जागतिक दिव्यांग दिनानिमित जि.प.पु.प्राथ.शाळा केसरी या प्रशालेत दिव्यांग मुलांना आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या शारीरिक त्रुटींवर मात करत आयुष्य सकारात्मकतेने जगण्याची ओढ लागावी यासाठी जगण्याची आशा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्तुत्य आणी नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी विद्यार्थी रिना बुधाजी मेस्त्री या दिव्यांग असलेल्या विद्यार्थीनीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी केसरी शाळेतील उपक्रमशिल शिक्षक श्री.दिपक राऊळ यानी मुलांसोबत फुगे फुगवून हाताने उडवणे,सुईने टोचून आवाज ऐकवणे या सारखे खेळ घेतले .यावेळी रिना मेस्त्री या दिव्यांग असलेल्या विद्यार्थीनीने फुगविलेला फुगा आपल्या स्वतःच्या हाताने फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी रिनाच्या चेह-यावर कमालीचा आनंद दिसत होता. अशा या रिनाची जगण्याची ओढ निश्चितच प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल. यावेळी वैष्णवी सोमण,तनिष्का पाटील, प्रियांका जंगले,पुर्वा सावंत, आर्या केसरकर प्रदिप कासले,विजय जंगले श्रृष्ठी नाईक या मुलांनीही खेळात सहभागी होऊन आनंद घेतला तसेच प्रभात फेरीही काढण्यात आली.
यावेळी जि.प.पु.प्राथ.शाळा केसरी या प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीम.तृषाली कदम,पदवीधर शिक्षक श्री.दिपक राऊळ, श्री.सुभाष सावंत,श्रीम.सावंत श्री रोशन राऊत, श्रीम.पाटील तसेच पालकही उपस्थित होते .या उपक्रमाबाबत पालकानीही समाधान व्यक्त केले.सर्वांचे स्वागत व आभार पदवीधर शिक्षक श्री.दिपक राऊळ यानी मानले.

अभिप्राय द्या..