You are currently viewing वैभववाडी नगरपंचायत प्रभाग क्रमांक ८ मध्ये निवडून येणारा भाजपाचा नगरसेवक आणि पराभूत होईल तो स्वीकृत नगरसेवक.;आमदार नितेश राणे.

वैभववाडी नगरपंचायत प्रभाग क्रमांक ८ मध्ये निवडून येणारा भाजपाचा नगरसेवक आणि पराभूत होईल तो स्वीकृत नगरसेवक.;आमदार नितेश राणे.

वैभववाडी /-

वैभववाडीत नगरपंचायत निवडणुकीत पार्श्वभूमीवर भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक आठ मध्ये माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे चिरंजीव रोहन रावराणे आणि विद्यमान उपसभापती अरविंद रावराणे यांचे चिरंजिव संताजी रावराणे अशा दोन पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती मात्र दोन्ही पदाधिकाऱ्यांना अपक्ष निवडणूक लढविण्याचा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला जो निवडून येईल तो नगरसेवक आणि जो पराभूत होईल तो स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपंचायत संधी देणार असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले तसेच दोन्ही उमेदवारांच्या भाजप पक्षातच असतील मात्र निवडणूक काळात दोन्ही उमेदवाराच्या प्रचाराला पक्षाचे कोणीही पदाधिकारी कार्यकर्ते येणार नाही दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या ताकदीवर निवडणूक लढवायची आहे असेही आमदार राणे यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, निवडणूक निरीक्षक संदेश सावंत, तालुकाध्यक्ष नासिर काझी, माजी सभापती दिलीप रावराणे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..