You are currently viewing अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब यांचा जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने सत्कार…

अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब यांचा जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने सत्कार…

कुडाळ /-

क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा अर्जुन पुरस्कार विजेती सिंधूकन्या कु. हिमानी परब यांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षा सौ. सावली पाटकर यांच्या हस्ते आज शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी युवती राष्ट्रवादी काँग्रेस सदैव पाठीशी राहील इंटरनेटच्या जमान्यात अंग मेहनतीच्या क्रीडाक्षेत्रातील काही क्रीडाप्रकार लोप पावत चालले असताना शिवछत्रपतींच्या काळापासून परिचित असलेला हा क्रीडा प्रकार मल्लखांब या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कौतुक केले तर अशा विविध क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक हिमानी सिंधुदुर्गात तयार व्हाव्यात अशी आशा व्यक्त केली.
यावेळी हिमानीचे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, उत्तम परब, सौ. परब, मृणाली कदम, प्रा. सचिन पाटकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..