You are currently viewing अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर महसूल विभागाच्या ताब्यात.;तहसीलदार अजय पाटणे यांनी केली कारवाई.

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर महसूल विभागाच्या ताब्यात.;तहसीलदार अजय पाटणे यांनी केली कारवाई.

मालवण /-

मालवण तालुक्यात अवैध पणे वाळू उपसा व वाळूवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली असून तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसात काळसे व नांदरुख गावात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडण्यात आले. हे दोन्ही डंपर महसूल विभागाने ताब्यात घेतले असून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेरी मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंगरे, धामापूर तलाठी एस. के. थोरात, कोतवाल पी. एस. चव्हाण, स्वप्नील पालकर यांच्या पथकाने काळसे रवळनाथ मंदिर नजीकच्या रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर क्रमांक एम. एच. ०७ एक्सएमएम-१७१७ पकडला. डंपरमध्ये दोन ब्रास वाळू सापडली.

अभिप्राय द्या..