You are currently viewing संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद वाडकर.;उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर यांची निवड.

संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद वाडकर.;उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर यांची निवड.

सावंतवाडी /-

संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद बाळा वाडकर, तर उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण आणि गणेश म्हापणकर यांची प्रत्येकी अडीच वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यावेळी संचालक विलास जाधव परशुराम चव्हाण, नरेश कारीवडेकर, प्रकाश बाबुराव रेडकर, सुलोचना वाडकर, संगिता वाडकर, दिगंबर पावसकर, सचिव सदानंद गंगाराम चव्हाण, दशरथ वाडकर आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला मोरजकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजन आरोंदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गोविंद वाडकर आणि बाबुराव चव्हाण या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये गोविंद वाडकर यांच्यावतीने सूचक विलास जाधव तर अनुमोदन दिगंबर पावसकर यांनी दिले. तर बाबुराव चव्हाण यांच्या बाजूने सुचक प्रकाश रेडकर यांनी तर अनुमोदन परशुराम चव्हाण यांनी दिले.

त्यानंतर बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेअंती अध्यक्षपदासाठी गोविंद वाडकर यांचे नाव बहुमताने निश्चित करण्यात आले. तसेच उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांचे नाव निश्चित करण्यात आले. मात्र उपाध्यक्षपदासाठी पुढील अडीच वर्षे गणेश म्हापणकर यांनाही संधी देण्याबाबत चर्चा झाली. याबाबतचा ठराव कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेऊन निश्चित करण्याबाबतच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी मोरजकर यांनी दिले. 2003 साली स्थापन झालेली संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद वाडकर असून त्यांची आज बहुमताने फेरनिवड झाली आहे तर चुरशीच्या ठरलेल्या उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बहुमताने निवड झाली आहे.

या निवडीनंतर उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण यांनी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे सांगून संस्थेचे हित म्हणजे जनतेच्या विश्वासाचे हित असल्याचे त्यांनी सांगितले व आपणास उपाध्यक्षपदी बहुमताने निवडून दिल्याबद्दल सर्व संचालक सचिव व हितचिंतक आणि ठेवीदारांचे त्यान आभार व्यक्त केले. तर नवनिर्वाचित अध्यक्ष तानाजी वाडकर यांनी इतर संस्थाची आर्थिक स्थिती पाहता कोरोना काळातही आपली संस्था यशस्वीपणे काम करू. १५ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आपल्या समाजबांधवांची हक्काची अशीही संस्था असून आपापसातील मतभेद चव्हाट्यावर येऊ नये. ही पतसंस्था आहे त्यामुळे कर्जदार, ठेवीदाराची गोपनीयता पाळावी. संस्थेचे हित जपावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. तसेच आपणास पुन्हा बहुमताने निवडून दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मोरजकर व त्यांच्या सहकार्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार अध्यक्ष वाडकर यांनी मानले. यावेळी संस्थेचे सचिव सदानंद चव्हाण यांनी सर्व संचालक आणि पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले या निवडीनंतर सावंतवाडी तालुका चर्मकार उन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष दिलीप इन्सुलकर तसेच कोषाध्यक्ष लक्ष्मण अरोस्कर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले या संस्थेचा आपल्या समाजाला मोठा फायदा होत असून संत रोहिदास यांच्या या नावाने सुरू झालेल्या या संस्थेची उत्तरोत्तर भरभराट होवो अशा शुभेच्छा तालुकाध्यक्ष इन्सुलकर यांनी यावेळी दिल्या श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दहा संचालक बिनविरोध निवडून आले

अभिप्राय द्या..