You are currently viewing वेंगुर्ले भटवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यमुखी

वेंगुर्ले भटवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यमुखी

वेंगुर्ला /-

     

 वेंगुर्ले तालुक्यातील भटवाडी येथील शेतकरी सुहास सहदेव तोरसकर यांच्या गोठयातील गायीवर मंगळवारी रात्रौ १२ ते १२.३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने गाय मृत्यमुखी पडल्याची घटना घडली आहे.त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत तोरसकर यांनी आज बुधवारी सकाळी वनविभागाला माहिती देताच मठ वनपाल अण्णा चव्हाण,मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी पंचनामा केला आहे.संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले असून त्वरित नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान नागरिकांनी दक्षता घेण्याचे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..