You are currently viewing वाभवे – वैभववाडीत नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का,प्रभाग १० मध्ये शिवसेना महिला पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी केला भाजप प्रवेश.

वाभवे – वैभववाडीत नितेश राणेंचा शिवसेनेला धक्का,प्रभाग १० मध्ये शिवसेना महिला पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी केला भाजप प्रवेश.

वैभववाडी /-

आमदार नितेश राणे आता इलेक्शन ऍक्शन मोडवर आले असून वाभवे- वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. सेनेच्या महिला शहर पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले आहे. आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रभाक क्रमांक 10 चा संपूर्ण गड आमदार नितेश राणे यांनी सर केल्याने शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. प्रवेश करणा-यामध्ये शिवसेनचे कार्यकर्ते दिवेश गजोबार, रणजित निकम, प्रसाद गजोबार, सुमित निकम, समीर गजोबार, अंकित गजोबार, दीपक धोंडू गजोबार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी भाजपा पक्ष निरीक्षक संदेश उर्फ गोटया सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, बंड्या मांजरेकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..