You are currently viewing असलदे रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक झाली बिनविरोध…

असलदे रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक झाली बिनविरोध…

१३ जागांवर उमेदवारांची निवड;गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी संस्थेच्या हितासाठी घेतला निर्णय…

कणकवली/-

श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार गावातील सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यावर सोमवारी छाननी झाल्याने संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली आहे. संचालक मंडळामध्ये-सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी- भगवान लोके(पत्रकार), दयानंद हडकर, दिनकर दळवी, विठ्ठल खरात, उदय परब, शामराव परब, संतोष परब, परशुराम परब या आठ जणांचे उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले.

तर महिला प्रतिनिधी – कांचन लोक सुनिता नरे,इतर मागास प्रवर्ग – शत्रुघ्न डामरे,अनु. जाती / जमाती प्रतिनिधी- अनंत सखाराम तांबे,भटक्या विमुक्त जाती / जमाती प्रतिनिधी – प्रकाश विठू खरात आदी १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी करीत हे अर्ज वैध ठरवले आहेत.

यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन प्रकाश परब, माजी सरपंच लक्ष्मण लोके, रघुनाथ लोके, सुरेश मेस्त्री, महेश लोके, विजय आचरेकर, अनिल कोठारकर, सचिन लोके, संतोष घाडी, विजय डामरे आदींसह असलदे गावातील ग्रामस्थ व शेतकरी सभासद उपस्थित होते.

अभिप्राय द्या..