You are currently viewing जि. प. महिला बालविकास विभागाच्या राजस्थान दौऱ्याचा खर्च वादाच्या भोवऱ्यात,जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी केली सखोल चौकशीची सीईओं कडे मागणी.

जि. प. महिला बालविकास विभागाच्या राजस्थान दौऱ्याचा खर्च वादाच्या भोवऱ्यात,जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी केली सखोल चौकशीची सीईओं कडे मागणी.

सिंधुदुर्ग/-

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राजस्थान येथील अभ्यास दौऱ्याचे नियोजन अत्यंत नियोजनशून्य होते. त्याचप्रमाणे चुकीच्या व नियमबाह्य पध्दतीने प्रत्येक महिला जि. प. सदस्यांकडून रु. १२,०००/- रोखीने घेण्यात आलेले होते. जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागामार्फत निधीची तरतुद करण्यात आलेली होती. परंतु ही तरतुद असतानाही अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झालेल्या जि. प. सदस्यांकडून रोखीने रक्कमही घेण्यात आली. मात्र सहभागी झालेल्या महिला जि. प. सदस्यांची राहण्याची व नाष्टा जेवणाची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे या दौऱ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी सीईओ प्रजित नायर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जि. प. महिला बालविकास विभागाच्या राजस्थान दौऱ्याचा खर्च वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अशाप्रकारच्या नियोजनशून्य अभ्यास दौऱ्याचा मक्ता कोणाला दिला व एकंदरीत जमा खर्चाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, कारण महिला बालकल्याण विभागा मार्फत अभ्यास दौऱ्यासाठी तरतुद केलेली असतानाही अभ्यास दौऱ्यासाठी सहभागी झालेल्या प्रत्येकी सदस्यांकडून रु. १२,००० रोखीने रक्कम जमा करूनही महिला जि. प. सदस्यांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत सदर ठेकेदारास रक्कम अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी प्रदीप नारकर यांनी सीईओ प्रजित नायर यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अभिप्राय द्या..