You are currently viewing सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या नंतर सहकारातले माहीर सतीश सावंत.;अतुल बंगे.

सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या नंतर सहकारातले माहीर सतीश सावंत.;अतुल बंगे.

हुमरमळा वालावल शिवसेनेने केला ५०वा वाढदिवस चेअरमन श्री.चसी माधव यांचा केला सत्कार!

कुडाळ /-

सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांनी जिल्हा बॅंकेबरोबर सहकार क्षेत्रात यशस्वी काम करुन जिल्ह्य़ातील विविध संस्था सक्षम केल्या त्याच पध्दतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी काम करुन सहकारातले शिवराम भाऊ जाधव नंतर सतिश सावंत सहकारातले माहीर ठरले असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढुन वालावल कृषि संस्थेला ५०वर्षे पुर्ण झाल्या बद्दल केक कापुन वाढदिवस साजरा करुन चेअरमन च सि माधव यांचा शाल श्रीफळ देऊन शिवसेनेचे अतुल बंगे सत्कार करण्यात आला.

या वेळी श्री बंगे बोलताना म्हणाले या जिल्ह्य़ात सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी सहकार रूजवुन सहकारात जिल्हा अग्रेसर ठेवला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आणि आदर्श घेऊन जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत हे जिल्ह्यातील सहकारातले माहीर समजले जातात म्हणूनच आज संस्था जिवंत राहीली पाहीजे सहकार वाढला पाहिजे ही भावना ठेवल्यानेच जिल्हा बॅंक ख-या अर्थाने शेतक-यांची असल्या सारखी सर्व सामान्य लोकांना वाटु लागले आहे असेही श्री बंगे यांनी सांगितले तसेच वालावल कृषि विभाग ही संस्था म्हणजे सर्व सामान्य शेतकरी वर्गाची संस्था मानली जाते या संस्थेच्या पन्नास वर्षे कारभार पारदर्शक झाला आणि आज चेअरमन च सि माधव प्रामाणिक काम करुन ही संस्था नावारूपाला आणली याचा सार्थ अभिमान हुमरमळा वासिंयांना आहे असेही श्री बंगे यांनी सांगितले यावेळी संस्थेचे सचिव श्री गणपत भरडकर यांचा शाल श्रीफळ देऊन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे हुमरमळा शाखाव्यवस्थापक विजय शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे सदस्य नामदेव परब, युवासेनेचे वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर, गणपत भरडकर, शंकर पाटकर, उपस्थितीत होते यावेळी हा कार्यक्रम हुमरमळा वालावल शिवसेना आयोजित शिवसेना शाखाप्रमुख रमेश परब यांनी आयोजित करण्यात आला होता.

अभिप्राय द्या..