You are currently viewing झोळंबेत आज रक्तदान शिबीर आणि जंगी डबलबारी भजनाचा सामना…

झोळंबेत आज रक्तदान शिबीर आणि जंगी डबलबारी भजनाचा सामना…

बांदा /-

झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त झोळंबे व्यायामशाळा येथे रविवारी 28 रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे. तसेच रात्री ८ वा. बुवा अभिजित पवार व बुवा अभिषेक शिरसाट यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. बुवा अभिजित पवार यांना प्रदिप वाळके हे पखवाज तर ओंकार परब तबला साथसंगत करतील. तसेच बुवा अभिषेक शिरसाट यांना रुपेश परब हे पखवाज व सिद्धेश मेस्त्री तबला साथसंगत करणार आहेत. शिबीरात रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप घोगळे यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..